नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने चंदगड-हिंडगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने चंदगड-हिंडगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

चंदगड-हिंडगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करताना कार्यकर्ते.
चंदगड / प्रतिनिधी
पद्मश्री डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा (रायगड) यांच्यावतीने व श्री समर्थ बैठक चंदगड मधील श्री दास यांनी मंगळवारी (ता. 23) रोजी चंदगड-हिंडगाव रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केले.  सर्व ठिकाणी वृक्षलागवड करून निसर्गाचा समतोल राखला जात आहे. झाडे वाढली जगली तरच आपल अस्तित्व टिकू शकेल म्हणून या राज्य सरकारच्या उपक्रमाला प्रतिसाद म्हणून वृक्षारोपण करण्यात आले. प्रतिष्ठान मार्फत वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रौढ साक्षरता, आरोग्य शिबिर, व्यसनमुक्ती निर्मूलन, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, विहीर स्वच्छता, जलपुनर्भरण असे विविध उपक्रम राबवण्यात येतात. या वृक्षरोपण कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण चंदगडचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रतिष्ठान मार्फत चालविल्या जाणाऱ्या बैठकीतील श्री दास मोठ्या संख्येने श्री सेवेसाठी उपस्थित होते. आज १५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment