शिवसेनाकडून चंदगड तालुक्यातील पुरग्रस्थां जीवनावश्यक वस्तूंची मदत - चंदगड लाईव्ह न्युज

16 August 2019

शिवसेनाकडून चंदगड तालुक्यातील पुरग्रस्थां जीवनावश्यक वस्तूंची मदत

शिवसेनेच्या वतीने चंदगड तालुक्यातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. 
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील पुरग्रस्थांना नुकताच महत्त्वाच्या जीवनावश्यक वस्तू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठिकठिकाणी वितरीत करण्यात आल्याची माहीती अजय चौधरी यांनी दिली. 
राज्यातील ठिकठिकाणी महापूराचा तडाखा बसला त्यात लोकांची अपरीमीत हाणी झाली. प्रचंड मानसिक आघात झाला.शेती,जनावरे, यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तूंची मोठी समस्या निर्माण झाली आहे. जनावरांचा चारा,निवारा तसेच कुटुंबातील अनेक समस्यामुळे पुरग्रस्थांना मदत देणे आवश्यक आहे त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दीलेल्या आदेशानुसार नुकताच गडहिंग्लज विभागात शिवसेना आमदार अजय चौधरी आपल्या सहका-यासह दाखल झाले आहेत.त्यांनी चंदगड तालुक्यातील  चंदगड, आसगाव,हंबीरे, अडकूर, हिंडगाव, फाटकवाडी कुरणी, बुझवडे ईत्यादी ठिकाणी  पुरग्रस्थांची भेट घेतली आणि सांत्वन केले. तसेच शिवसेना च्या वतीने पूरग्रस्तांना  जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून दील्या. या मदतीमध्ये अन्नधान्य सामुग्री, अंथरूण, पांघरूण, व ईतर महत्त्वाचे साहित्य आहे त्याचे वितरण ठिकठिकाणी  करण्यात आले.यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाधि प्रमुख प्रभाकर खांडेकर, विधानसभा संघटक संग्रामसिंह कुपेकर,सह संपर्क प्रमुख प्रा.सुनिल शिंत्रे नगरसेविका किशोरीताई पेडणेकर, नगरसेवक अनिल कोकीळे यांच्यासह ईतर मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment