र. भा. माडखोलकर यांच्या स्मृतिदिनी तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2019

र. भा. माडखोलकर यांच्या स्मृतिदिनी तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा उत्साहात


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड येथे  र. भा. माडखोलकर यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत प्राथमिक गटात स्वरा शिरगावकर, शर्विल घोळसे, जान्हवी पाटील, आदित्य बोकडे, अयान शेख, यश डांगे, शैलेश धुडूम, पार्थ भोगण यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. तर माध्यमिक गटात शंतनू बेनके, सुनैन फडके, वैभव गुरव, तेजस बेरडे, करण पाटील, शुभम पाटील, प्रसाद देसाई, धन प्रधान यांनी अनुक्रमे क्रमांक पटकाविले. स्पर्धेत ६३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्व. र. भा. माडखोलकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात या स्पर्धेचे बक्षिस वितरण रविवार १३ ऑक्टोंबर 2019 रोजी दुपारी १ वाजता चंदगड विद्या संकुलातील गोगटे सभागृहात मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. No comments:

Post a Comment