![]() |
कार्वे (ता. चंदगड) येथे वंचित बहुजन आघाडीच्या सभेत बोलताना विनायक उर्फ अप्पी पाटील, व्यासपीठावर राजा शिरगुप्पे, संग्राम सावंत, जी. व्ही. दैठणकर व इतर. |
कोणताही राजकीय हेतु नसताना केवळ तालुक्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या हितासाठी दौलत कारखाना चालवायला घेतला. कारखाना सुरु कऱण्यासाठी 70 ते 75 कोटी रुपये गुंतवले. मात्र राजकीय हेतुने प्रेरीत होवून तालुक्यातील काही विघ्नसंतोषी मंडळींनी मला प्रचंड त्रास देवून चालू कारखाना बंद पाडला. मात्र मी दौलत कारखाना सुरु करुन जिल्हा बँकेला उर्जितावस्था निर्माण करुन दिली. चंदगडच्या जनतेसाठी मी यातना भोगतोय. पण जनता या घटनेचा साक्षीदार असून या निवडणुकीत विरोधकांना जनताच उत्तर देईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी पक्षाची उमेदवार विनायक उर्फ पी पाटील यांनी केले ते मजरे कारवे तालुका चंदगड येथे प्रचार सभेत बोलत होते
राजा शिरगुप्पे म्हणाले,``मुठभर लोकांनी जनतेला गुलाम करून ठेवले आहे आणि कष्टकरी लोक मात्र सत्ता समता आणि विविध कणांपासून वंचित आहेत. त्यामुळे परिवर्तनासाठी विविध जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन ती अप्पी पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी शिवानंद हैबतपुरे यांनी भाजप सरकारवर टीका करत वंचित बहुजन पक्षाची स्थापना प्रकाश आंबेडकरांना का करावी लागली याबाबत प्रबोधन करून त्यांनी मोदी आणि शहा हे दोघच सरकार चालवत असून मंत्रीमंडळ म्हणजे शोभेचे वस्तू असल्याचे सांगितले. संग्राम सावंत व पी. डी. पाटील यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी बाळासाहेब हळदणकर, युवराज नाईक, संदीप गणाचारी, पुंडलिक कांबळे, आर. पी. कामात, विष्णू नाईक, अश्विन पाटील, विवेक मंनगुतकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर अनुपस्थित..............
कार्वे येथील सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर उपस्थित रहाणार होते. पण काही तांत्रिक कारणास्तव ते उपस्थित राहु शकले नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्यामध्ये नाराजीचा सुर होता. सभेला कार्यकर्त्यांची गर्दी होती.
No comments:
Post a Comment