![]() |
जंगमहट्टी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी श्रमदानातून तयार केलेला हाच ता रस्ता. |
चंदगड तालुक्यातील पुरोगामी विचारांचा प्रभाव असलेल्या जंगमहट्टी (ता. चंदगड) या गावातील ग्रामस्थांनी श्रमदान करून रस्ता तयार केला आहे. त्यामुळे तालुक्यातून जंगमहट्टी ग्रामस्थांचे कौतुक केले जात आहे.
जंगमहट्टी या ठिकाणी असलेल्या मध्यम प्रकल्पाकडे जाणारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रकल्प कृती समितीचे अध्यक्ष प्रा. विजयभाई पाटील व शे. का. पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीचे रवींद्र पाटील व सर्व सहकाऱ्यांनी सर्व स्तरावर प्रयत्न केले. मात्र त्याला यश येत नाही. यामुळे ग्रामस्थांनी विचारविनिमय करुन हा रस्ता गाव स्तरावर श्रमदानातून करण्याचे ठरविले.
या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात आली. रस्ता कामी सचिन पाटील यांनी जेसीबी देवुन सहकार्य केले. सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने हा रस्ता मजबूत स्वरूपात तयार केला. अशाच प्रकारे सन 1979 मध्ये जंगमहट्टी ते तुर्केवाडीकडे जाणारा सुमारे तीन कीलोमीटरचा अंतराचा रस्ता तत्कालीन गावचे सरपंच अँड. व्ही. बी. पाटील यांच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी श्रमदानातून केला होता. तो रस्ता आजही सुस्थितीत आहे. आता ग्रामस्थांनी श्रमदान करून केलेला रस्ता पाहून पुर्वी केलेल्या रस्त्याच्या कामाची आठवण केली जात आहे. सद्या ग्रामस्थांनी श्रमदानातून केलेल्या दर्जेदार रस्त्याची लोकांतून प्रशंसा होत आहे. महादेव राउत, नामदेव जाधव, सटुप्पा साळुंखे, जोतिबा कानडीकर, भरमाना जाधव, विठ्ठल गावडे, धोंडीबा पारसे, प्रकाश मोरे, निंगाप्पा गावडे, दतु गुरव आदीच्या पुढाकाराने या रस्त्यासाठी ग्रामस्थांना सोबत घेवुन काम मार्गी लावले.
No comments:
Post a Comment