विक्रम अरुण पाटील |
कार्वे (ता. चंदगड) येथील महात्मा फुले विद्यालय व गुरुवर्य म. भ. तुपारे ज्युनिअर महाविद्यालयाचा खेळाडू विक्रम अरुण पाटील याने दिल्ली येथे झालेल्या नॅशनल चॅंपियनशिप कुस्ती स्पर्धेत 19 वर्षाखालील 87 किलो वजनी गटात ग्रिको रोमन कुस्ती प्रकारात भारत देशात द्वितीय क्रमांक मिळविला.
नवी दिल्ली येथे पार पडलेल्या कुस्ती स्पर्धेत विक्रम पाटील याने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. यापूर्वी मांडेदूर्ग येथील राम पवार याने ही शालेय कुस्ती स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत सलग तीन वर्षे मजल मारली होती. परंतु या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळविता आले नव्हते. यावर्षी मात्र जय्यत तयारीनिशी विक्रम पाटील याने द्वितीय क्रमांक मिळविला. त्याला प्राचार्य एल. जी. पाटील, पर्यवेक्षक एस. वाय. कुंभार यांचे प्रोत्साहन तसेच क्रीडा शिक्षक पी. वाय. बोकडे, सुरज हारकारे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विक्रम पाटील याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने प्रतिकूल परिस्थितीतून त्याने हे यश त्याने संपादन केले आहे. त्याच्या पुढील भवितव्यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. समाजातील सर्व दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्थांनी पुढे येवून मदत करावी.
No comments:
Post a Comment