पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करावी, या मागणीचे निवेदन कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना देताना खासदार छत्रपती संभाजीराजे. |
कोल्हापूर / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट. त्वरीत सर्व संबंधित अधकाऱ्यांची बैठक घेऊन सर्व ते सहकार्य केले जाईल असे आश्वासन कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिले.
महापुर आणि परतीच्या अतिरिक्त पावसामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याआधी महाराष्ट्रात अनेक वर्ष दुष्काळ होता. आजकाल दिवसागणिक किमान दोन शेतकरी आत्महत्या करीत आहेत. महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या शेतकरी अर्थव्यवस्थेचे न भरून निघणारे नुकसान झाले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर या विषयात हस्तक्षेप करून मार्ग काढावा ही विनंती आज संभाजीराजे यांनी केली. अनेक विमा कंपन्या सध्या शेतकऱ्यांना अकारण त्रास देत आहेत. काही वर्षातच दहा हजार कोटींची नफा कमावनाऱ्या कंपन्यांनी यावर्षी टेंडर मध्ये सहभागी सुद्धा झाल्या नाहीत. अशा प्रकारे शेतकरी असेल किंवा सरकार असेल सर्वांच्या हातावर तुरी दिली. यावर कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आश्चर्य व्यक्त करत तात्काळ चौकशी करण्याचे आश्वासन दिले. या संदर्भात लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्रातील, शेतकऱ्यांना लवकरात लवकर आणि सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही कृषी मंत्र्यांनी खासदार संभाजीराजे यांना दिले.
No comments:
Post a Comment