मांडेदुर्ग येथे सोमवारी नाचणी प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

22 November 2019

मांडेदुर्ग येथे सोमवारी नाचणी प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
मांडेदुर्ग (ता. चंदगड) येथील शिवमूद्रा शेतकरी गट व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा यांचे संयुक्त विद्यमाने सोमवार 25 व 26 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नाचणी प्रक्रिया प्रशिक्षणाचे  आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी स्वयंशिध्दा संस्था कोल्हापूरच्या कांचनताई परुळेकर या मार्गदर्शक करणार आहेत.  कार्यकमाला कोल्हापुर आत्माच्या संचालक श्रीमती सुनंदा कुराडे, गडहिंग्लज उपविभागीय अधिकारी डॉ. नंदकुमार कदम यासह कोल्हापुर प्रकल्प उपसंचालक अशोक पाटील, चंदगड तालुका कृषी अधिकारी किरण पाटील, मंडळ कृषी अधिकारी युवराज पाटील, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावने उपस्थित रहाणार आहेत. नाचणी प्रक्रिया प्रशिक्षण याविषयी अधिक माहिती साठी इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे शिवमुद्रा शेतकरी गटाचे अध्यक्ष गणपत पवार यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment