![]() |
राहुल भरमाना गावडे |
शाळा ही गावाचा आरसा आहे .शाळेचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय गावाचा विकास पूर्णत्वाला जाणार नाही हे ओळखून शाळेचे रूप पालटणसाठी माझा वर्ग,माझी ओळख या उपक्रमासाठी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत हलकर्णी (ता. चंदगड) गावातील उद्योजक, युवा नेते राहुल भरमाना गावडे यांनी रुपये 25000 अशी भरीव देणगी देवून सामाजिक बांधिलकी जोपासली.
समाजाच्या सहभागाशिवाय शाळेचा विकास होणार नाही हे ओळखून शाळेसाठी एक दिवस ही संकल्पना मांडून दर सोमवारी शाळा व्यवस्थापन समिती सोबत किमान एक तास शाळेला भेट देऊन आढावा व नियोजन करणेचे निश्चित केले .शैक्षणिक उठाव साठी गाव जागृती करणेसाठी स्वतः भरीव देणगी देऊन या कामाची सुरवात केली . या बद्दल राहुल गावडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
1 comment:
😜
Post a Comment