रास्त भाव दुकानदारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची शासनाने मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

रास्त भाव दुकानदारांच्या सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची शासनाने मागणी


तेऊरवाडी ( प्रतिनिधी )
संपूर्ण भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव चालू आहे . सर्वत्र लॉक डाऊन असतानाही महाराष्ट्रात अत्यावश्यक सेवा म्हणून रास्त भाव दुकानदार आपली सेवा बजावत आहे. पण शासनाकडून या दुकानदारासाठी कोणतीच सुरक्षा नसल्याने शासनाने या वर्गासाठी सुविधा देण्याची मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेने केली आहे.
शासनाकडून रास्त भाव दुकानदारामार्फत लाभार्थी  रेशन कार्ड धारकाना धान्य पुरवठा केला जातो. सध्या कोरोनाच्या प्रसारामुळे पोलीस, डॉक्टर, सफाई  कर्मचारी आदिना शासनाने सॅनिटायझर, मास्क बरोबर विम्याचे संरक्षण दिले आहे. पण नेहमी राशन वाटप करताना हजारो लोकांशी संपर्क येत असणाऱ्या रास्त भाव दुकानदाराना कोणतेच संरक्षण नाही. त्याचबरोबर ५० किलोचे पोते वाटपानंतर त्या पोत्यामध्ये  तूट येत आहे . ही येणारी तूट तसेच सदरच्या धान्याचे कामिशन देण्याची मागणीही केली जात आहे . रेशन धान्य दुकानदारही माणूसच आहे, त्याना सुद्धा कुटूंब  आहे. त्यामूळे शासनाने अशा वर्गासाठी मदत करण्याची मागणी  कोल्हापूर जिल्हारास्त भाव दुकानदार संघटनेने केली आहे.

1 comment:

Unknown said...

Amhi lockdown kela tar sarv blockdoun hotil.

Post a Comment