आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याचेही केले आवाहन
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, या संकटकाळात संचारबंदीमुळे अनेकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे अनेक निराधार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. याची दखल घेत अशाच निराधारांना तुर्केवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य चेतन बांदिवडेकर आणि खादी ग्रामोद्योग चंदगडचे संचालक प्रकाश सौदागर यांनी मदतीचा हात दिला आहे. तुर्केवाडी आणि वैताकवडी येथील अल्पसंख्यांक समाजातील कुटुंबांना जीवनावश्यक वास्तूंचे किट मदातस्वरूपात दिले. संचारबंदी आणि सोशल डिस्टनसिंगचे महत्व लक्षात घेत या कुटुंबांच्या घरी जाऊन ही मदत सुपूर्द करण्यात आली. यावेळी गावकामगार पोलीस पाटील माधुरी कांबळे, सरपंच रुद्राप्पा तेली, उपसरपंच अरुण पवार, ग्रामसेवक अशोक पाटील, कोरोना दक्षता कमिटीचे चेतन बांदिवडेकर, जोतिबा गावडे, प्रकाश सौदागर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
तसेच यावेळी मास्क वापराने, हात वारंवार स्वछ धुणे, घरीच राहणे, कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर न पडणे, सोशल डिस्टनसिंग पाळणे आणि आरोग्य सेतू ऍप डाऊनलोड करण्याबाबत बांदिवडेकर आणि सौदागर यांनी जनजागृती केली.
आरोग्य सेतू अॅपबाबत जनजागृती
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तुर्केवाडी गावामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. लोकांना मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबत माहिती देत आरोग्य सेतू ऍप डाउनलोड करण्याचे आवाहन देखील केले जात असल्याचे चेतन बांदिवडेकर यांनी सांगितले. आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून आपण कोरोनाच्या सर्व माहिती मिळवू शकतो. आपल्या परिसरात तसेच आपल्या आसपास कोरोना रुग्ण तर नाही ना याची देखील माहिती आपल्याला या ऍपच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रयत्न केले पाहिजेत असे बांदिवडेकर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment