![]() |
कळसगादे (ता. चंदगड) येथे शेतातील विहिरीत पडलेला गवा. |
चंदगड / प्रतिनिधी
कळसगादे (ता. चंदगड) येथे आणाप्पा मुकुंद गोंडे या शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीत पडलेल्या गव्यास ग्रामस्थ व वनविभागाच्या मदतीने जीवदान मिळाले आहे. मंगळवारी (ता. 14) अण्णांप्पा गोंडे यांच्या शेतामधील लहान विहिरीत दोन गवे पडले होते. दुपारी तीनच्या सुमारास गोंडे हे शेतात गेले असता त्यांना विहिरीतुन कसलातरी आवाज येत असल्याचे ऐकू आले. म्हणून त्यानी विहिरीत बघीतले असता गवा विहीरीत असल्याचे दिसून आले.
त्यापैकी एक गवा चढून बाहेर पडून निघून गेल्याचे जाणवले. तर एक गवा आतच अडकून पडला होता. सदर घटनेची एकनाथ गोंडे यांनी वनविभागाला फोनद्वारे माहिती दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवून पहाणी केली. परिस्थितीचा आढावा घेवून अखेर जेसीबीच्या सहाय्याने गव्याला विहीर फोडून मार्ग करुन देण्यात आला. त्या मार्गावरून गवा बाहेर पडून वनक्षेत्रात पळून गेला. ग्रामस्थ व वनकर्मचारी यानी विहिरीत अडकलेल्या गव्याला जीवदान दिले. वनक्षेत्रपाल दत्ता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल बी.आर भांडकोळी, वनरक्षक जी एम वळवी,डी एम बडे, वनकर्मचारी मोहन तुपारे, विश्वनाथ नार्वेकर,पोलीस पाटील सदानंद सुतार,दौलत दळवी, महेंद्र गवस,संजय दळवी,संतोष दळवी,आनंद दळवी आदींनी गव्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले. गवे शेतपिकात येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसेच ग्रामस्थांनी एकट्याने शेताकडे जाऊ नये असे आवाहन वनक्षेत्रपाल पाटील यानी केले आहे.
No comments:
Post a Comment