शिक्षण विभागाच्या दोन वेगवेगळ्या पत्रामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

शिक्षण विभागाच्या दोन वेगवेगळ्या पत्रामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विध्यार्थी व पालक यांच्यामध्ये संभ्रम


तेऊरवाडी / प्रतिनिधी  (एस. के. पाटील) 
        माध्यमिक  शिक्षणाधिकारी कोल्हापूर यांना शिक्षण संचालकानी  १३ एप्रिल २०२० च्या  दूरध्वनी संदेशाने study from home उपक्रम राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या. त्यानुसार  शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी कार्यवाही केली. १३ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना पत्र पाठवून सदर उपक्रम राबवण्याबाबत पत्र पाठवले. पण शिक्षण विभागाच्या दोन वेगवेगळ्या पत्रामुळे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
        सदर पत्रात दिनांक १५एप्रिल पासून study from home राबवावेतसेच मुख्याध्यापकांनी प्रश्नपत्रिका आपल्या स्तरावर तयार करावी ,सदर इयतानिहाय प्रश्नपत्रिका व्हाट्सएपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत सोडवण्यास देने तसेच विद्यार्थ्यांनी त्या प्रश्न पत्रिका सोडवणे  व परत व्हाट्सएप वर घेणे व तपासून निकालाचे विश्लेषण करावे असे सूचित केले आहे.
        या विरुद्ध राजेंद्र पवार उपसचिव शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिनांक १३एप्रिल २०२० रोजी पत्र पाठवून इयता १लीते १२ वी पर्यंत च्या परीक्षा व पेपर तपासणी बाबत खुलासा केला आहे.त्यानुसार इयता १ली ते ८ वीच्या परीक्षा घेऊ नयेत, ९वी व ११वी वीच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा घेऊ नयेत, असे सांगितले आहे. तसेच ९वी व ११ वीचे मूल्यमापन प्रथम सत्र, चाचण्या, अंतर्गत मूल्यमापन यावर आधारित वर्ग उन्नती द्यावी असे सांगितले आहे. 
       या दोन परस्पर पत्राने मुख्याध्यापक ,शिक्षक ,विध्यार्थी व पालक यांच्या मध्ये  संभ्रम निर्माण झाला आहे कारण सर्वच पालकांच्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाहीत; मग ज्या पालकांच्याकडे असे फोन नाहीत त्यांनी काय करायचे? आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांना मोबाईलमध्ये बॅलन्स मिळवणे अनेक कारणाने अवघड होतं आहे.अश्या परिस्थितीत असे ऑनलाईन परीक्षा घेणे शक्य होणार नाही ,हे लक्षात  घ्यावे; तसेच  राजेंद्र पवार यांच्या पत्राचीही दखल घ्यावी. 
         तसेच संचालक यांनी सुचवलेली study from home ही पद्धती अनिवार्य न करता वैकल्पिक करावी.अशी  विनंती वजा माहिती राजेंद्र सूर्यवंशी कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग यांनी दिली असून शासनाने हा संभ्रम त्वरीत दूर करण्याची  गरज निर्माण झाली आहे. 

No comments:

Post a Comment