सोमनाथ गवस |
देशासह राज्यात करोनाचे संकट दिवसेनदिवस वाढत आहे. करोनामुळे जेष्ठांना त्याचा मोठा धोका आहे. जेष्ठ मंडळीचे निवृत्तीवेतन दरमहा बॅक ऑफ इंडियामध्ये जमा होते. औषधोपचार व अन्य गरजांसाठी त्यांना पैशाची गरज असते. दरमहा एक ते दहा तारखेपर्यंत बँकेच्या बाहेर जेष्ठ लोकांची पैशासाठी गर्दी असते. या गर्दीमध्ये तासनतास लांबच-लांब रांगेत कडक उन्हात उभे राहून बँकेतील पैसे काढण्यासाठी जेष्ठ मंडळींना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे जेष्ठांचे निवृत्तीवेतन बॅंक ऑफ इंडियाने घरपोच द्यावे अशी मागणी जेष्ठ नागरीक संघटनेचे जिल्हा सचिव सोमनाथ गवस यांनी केली आहे.
चंदगड या तालुक्याच्या ठिकाणी व शहरामध्ये एकमेव राष्ट्रीयकृत बँक आहे ती म्हणजे बॅंक ऑफ इंडिया. बँकेच्या चंदगड शाखेकडे शिक्षक, सैनिक कृषि पाटबंधारे, पोलिस, आरोग्य व महसूल अशा विविध खात्यातील सेवानिवृच कर्मचारी आपले मासिक निवृत्त वेतन घेत असतात. एक ते दहा तारखेपर्यंत या बँकसमोर जत्रेचे स्वरूप आलेले असते. यावेळी सुरक्षित अंतराचा नियम पाळल्याने हि ही रांग संभाजी चौकापर्यंत जाते. ऊन्हा-तान्हांत अनेक ज्येष्ठ ताटकळत असतात. घरी अंथरूणावर असलेल्या ज्येष्ठांचे वेतन मिळविणेसाठी नातेवाईकांची धडपड सुरू असते. खातेदार प्रत्यक्ष बँकेत आल्याशिवाय निवृतवेतन दिले जात नाही. आजारी माणसाला बँकेत आणणे जिकीरीचे होते. बंदच्या काळामध्ये पैशाची अत्यंत गरज असलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे वेतन बँक व्यवस्थापनाने घरपोच देण्याची व्यवस्था करावी, खातेदारांच्या मागणीनुसार नजिकच्या पतसंस्थेत किंवा बँकेत वर्ग करावी. त्याचबरोबर खात्रीच्या नातेवाईकांकडे सुपूर्द करावी. रिझर्व बँकेच्या धोरणानुसार ज्येष्ठ नागरिकांना निवृत् वेतन सहज उपलब्ध होईल. यासाठी नियोजन करावे अशी मागणी यापूर्वी करण्यात आली होती. मात्र त्याकडे बँकेकडून दुर्लक्ष झाले आहे. बॅंक ऑफ इंडिया चंदगड शाखेसमोर ज्येष्ठ नागरिक संघटना आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहे. याबाबत बँक व्यवस्थापनाने तातडीने निर्णय घेवून जेष्ठ नागरीकांना दिलासा द्यावा अशी मागणी जेष्ठ नागरीकांनी केली आहे.
No comments:
Post a Comment