तेऊरवाडीतील त्या भटक्या लोकांना पुरवल्या सुविधा, चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल - चंदगड लाईव्ह न्युज

12 May 2020

तेऊरवाडीतील त्या भटक्या लोकांना पुरवल्या सुविधा, चंदगड लाईव्ह न्यूजच्या वृत्ताची प्रशासनाने घेतली तात्काळ दखल

गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी घटनास्थळी दिली भेट
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे अडकून पडलेत्या भटक्या समाजातील लोकांना मदत देताना प्रांताधिकारी विजया पांगारकर व कर्मचारी. 

                                                                      चंदगड लाईव्ह न्युज बातमीचा इफेक्ट

तेऊरवाडी / प्रतिनिधी 
          कोरोनात  लॉक डाऊनमुळे तेऊरवाडी (ता. चंदगड) येथे अडकलेल्या मध्यप्रदेशातील  कटला येथील त्या भटक्या जातातील लोकांना गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन तात्काळ  सर्व प्रकारच्या  सुविधा पुरवल्या. त्यामुळे प्रशासनास दखल घेण्यास भाग पाडलेल्या चंदगड लाईव्हच्या वृत्ताचे व वृत्ता प्रतिनिधींचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे .
भटक्या समाजातील महिलेची व्यथा जाणून घेताना प्रांताधिकारी. 
         चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे मध्यप्रदेशातील जबलपूर कटला येथील ४८ भटक्या जमातीतील फाशेपारथी बांधव गेल्या दिड महिन्यापासून अडकून पडले आहेत. ओ भाऊ काय तरी खायला द्या की, या मथळ्याखाली बातमी व व्हीडोओ प्रसिद्ध केला होता. याची तात्काळ दखल घेऊन प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी या फाशेपारथी लोकांना सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. यामध्ये तांदूळ, कपडे, सॅनिटायझर, तेल, साबन, सॉक्स आदि गोष्टींचा समावेश होता. यावेळी आमच्या आमच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रांताधिकारी म्हणाल्या की, ``प्रशासनाकडून या सर्वांची योग्य ती काळजी घेण्यात येणार आहे. या सर्वांची वैद्यकिय तपासणी करून त्याना मध्य प्रदेशला पाठवण्यासाठी  प्रशासन प्रयत्न करत आहे. चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी यावेळी फोनवरुन प्रशासनाला सर्व त्या सूचना दिल्या आहेत. पालकमंत्री सतेज पाटील व जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना यासंदर्भात विनंती करुन त्या सर्वाना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी प्रयत्नशिल आहे. याबरोबरच लॉकडॉऊनच्या या काळातही कोरडवाहू असणाऱ्या तेऊरवाडी गावाने या सर्वाना केलेले सहकार्य माणूसकीचे दर्शन घडवत आहे. प्रशासन या सर्वाना मध्यप्रदेशात पोहचविण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. यावेळी तेऊरवाडीच्या सरपंच श्रीमती सुगंधा कुंभार, उपसरंच सौ. शालन पाटील, सदस्य राजेंद्र भिंगुडे, विठठल पाटील उपस्थित होते.



No comments:

Post a Comment