![]() |
तेऊरवाडी येथे मध्य प्रदेशातील लोकांची तपासणी करताना डॉ.विचारे, डॉ. पाटील. |
लॉकडाऊनमुळे चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी येथे अडकलेल्या मध्यप्रदेशातील त्या भटक्या जमातीतील सर्वच्या सर्व ४८ जणांची आज तात्काळ वैद्यकिय तपासणी करण्यात आली.
काल गडहिंग्लज उपविभागाच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर यानी येथील सर्व भटक्या लोकांना भेट देऊन शासनाकडून तांदूळ मास्क,सॅनिटायझर व जीवणावश्यक वस्तू पुरविल्या होत्या. याचबरोबर या सर्वांसाठी आज मेडिकल कॅम्प घेऊन आरोग्य तपासणी करण्याचा आदेश दिला होता.
![]() |
तेऊरवाडी येथे तपासणीवेळी उपस्थित डॉक्टरांची टीम. |
यानुसार कोवाड येथील डॉ.एन.एस.विचारे आणि डॉ. व्ही.पी.पाटील यानी सर्वांची लेझर थर्मामिटरच्या साह्याने तपासणी केली . या सर्वांचे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाले असून यापैकी अनेकांना खरुज झाली आहे . जंगलातच वावर असल्याने शरीराला जखमा झाल्या आहेत . या सर्वांची तपासणी करुन योग्य ती औषधे दिली असल्याची माहिती डॉ . पाटील व डॉ़ .विचारे यानी दिली . यावेळी तलाठी दिपक कांबळे , डॉ .राजेंद्र पाटील , ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील , संजय पाटील , बी.टी. पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment