उत्साळी (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांची विचारपूस करताना सरपंच माधुरी सावंत-भोसले. |
चंदगड / प्रतिनिधी
देशभरात कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावरून सर्वोतपरी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. अनेकजण सरकारी नियम पाळताना दिसत नाहीत. परंतु अशा कठीण प्रसंगातही उत्साळी (ता. चंदगड) येथील सरपंच स्वतः अलगीकरण केलेल्या मुंबईकरांची विचारपूस करून ग्रामस्थांना धीर देत आहेत. एकजुटीने कोरोना निवारणासाठी ग्रामस्थांची साथ असणे गरजेचे असल्याचे सांगितले.
विशेष म्हणजे हे सर्व करताना सोशल डिस्टन्सींगचे तंतोतंत पालन केले जात आहे. गावासाठी नियुक्त केलेल्या डॉक्टरांना बोलावून त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबई, पुणे येथून आलेल्या नागरिकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेतवडीतील घरे, काजू कारखाना, इत्यादी ठिकाणी रविवारी भेटी देऊन माहीती घेवून शहरातून आलेल्यांना दिसाला दिला. क्वारंटाईन होणे हे स्वतः साठी व आपल्या गावासाठी किती महत्वाचे आहे हे पटवून दिले. आपले सदस्य, कर्मचारी, स्वयंसेवक यांना घेऊन औषध फवारणी करणे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्या मार्फत सर्वे करणे इत्यादी कामे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या या कामाबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
1 comment:
खुप छान वहिनी .
Post a Comment