ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील पंधरा टक्के रक्कम मागासवर्गीय समाजातील लोकांना सहाय्य म्हणून द्यावी - बसपाकडून मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

19 May 2020

ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील पंधरा टक्के रक्कम मागासवर्गीय समाजातील लोकांना सहाय्य म्हणून द्यावी - बसपाकडून मागणी

ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतील पंधरा टक्के रक्कम मागासवर्गीय समाजातील लोकांना सहाय्य म्हणून द्यावी. या मागणीचे निवेदन देताना बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कांबळे व इतर. 
चंदगड / प्रतिनिधी
        चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या तीन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीतून मिळणारी  पंधरा टक्के रक्कम त्या-त्या गावातील मागासवर्गीय समाजातील कुटुंबाना जीवनावश्यक साधनांंच्या माध्यमातून मदत म्हणून द्यावी अशा मागणीचे निवेदन नुकताच चंदगड तहसीलदार यांना बहुजन समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांनी दिले आहे.
        सद्या देशात कोरोना च्या महामारीमळे लोकांत मोठ्या भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वत्र रोजगार ,उद्योग धंदे बंद पडले आहेत. आशा परिस्थितीत गोरगरीब लोक मोठ्या अडचणी आले आहेत.चंदगड, आजरा व गडहिंग्लज तालुक्यातील मागस वर्गातील लोकांना मोठ्या समस्या ना सामोरी जावे लागत आहे. या तीन्ही तालुक्यातील ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून   मागास वर्गासाठी दर वर्षी खर्च केली जाणारी पंधरा टक्के रक्कम तालुक्यातील मागासवर्गीय कुटुंबाना जीवनावश्यक साहित्य स्वरूपात मदत म्हणून म्हणुन देण्यात यावी असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment