पूणे -मुंबई वरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोरेवाडी ( ता. चंदगड ) येथील ग्रामस्थांनी उभारलेल्या झोपड्या. |
चंदगड / प्रतिनिधी
अडकूर ( ता. चंदगड ) परिसरात मोठ्या संख्येने मुंबईकर आपल्या मूळ गावी परतत असल्याने ग्रामसमित्या दक्ष झाल्या आहेत . तर बाहेरून येणाऱ्यांना कॉरंटाईन करण्यासाठीच्या इमारती अपूऱ्या पडत असल्याने अनेक गावात ग्रामस्थांनी चक्क झोपड्याच बनवल्या आहेत .
अडकूर परिसरातील विंझणे ,गणूचीवाडी , मोरेवाडी , उत्साळी , सत्तेवाडी , अलाबादेवी , बोंजूर्डी , मलगेवाडी , शिरोली आदि गावातील अनेकजन नोकरीनिमित्य मुंबई ,पूणे , ठाणे , गोवा आदी ठिकाणी कामाला आहेत . पण कोरोणाच्या प्रभावामूळे हे सर्व चाकरमानी गावी परतू लागले आहेत . अडकूर येथे मोठ्या प्रमाणात इमारती असल्याने बाहेरुन येणाऱ्यांना या इमारतीमध्ये कॉरंटाईन करणे सोपे झाले आहे . पण परिसरातील इतर गावामध्ये शालेय इमारती खूपच मर्यादीत असल्याने प्रचंड मोठया संख्येने येणाऱ्या चाकरमान्यांना या इमारती अपूऱ्या पडत आहेत.बोंजूर्डी येथे मराठी शाळा , सेवा सोसायटी व एका खाजगी घराचा वापर कोरं टाईन साठी वापरला आहे . तर मोरेवाडी येथे शाळा वर्ग खोल्या दोन तर बाहेरून आलेली संख्या ५० च्या आसपास . अजून गावी येणाऱ्यांची संख्या १०० . त्यामूळे ही सर्व अडचण लक्षात घेऊन ग्रामस्थानी
गावाशेजारी चक्क झोपड्या बांधून यामध्ये कुटूंबानुसार राहण्याची पूर्ण व्यवस्था केली आहे . येथे लाईटची व्यवस्था केली आहे . बोंजूर्डी - मोरेवाडीच्या पोलिस पाटील सौ . माधूरी पाटील यानी तर या दोन्ही गावांचे व्यवस्थापन खूपच चांगले ठेवले आहे . तसेच सरपंच , सर्व ग्राम पंचायत सदस्य , दक्षता कमिटी , मोरेवाडीतील यूवक वर्ग गावामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची नोंद ठेवत आहेत . गावामध्ये कोणालाच प्रवेश दिला जात नाही . त्याचबरोबर गावाबाहेर जाणाऱ्यांना चौकशी करुनच बाहेर सोडले जात आहे . त्याचबरोबर सॅनिटयझरचा व मास्कचा वापर , गावात औषध फवारणी हे सर्व करण्यात येत आहे . रेड झोनमधूनही येणाऱ्या आपल्या बांधवांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्वच गावातील ग्रामस्थ झटत असल्याचे चित्र अडकूर परिसरात दिसून येत आहे.
1 comment:
Good arrangment
Post a Comment