कृषि विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2020

कृषि विभागामार्फत फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

कोवाड / प्रतिनिधी
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत फळबाग लागवड, नाडेप, गांडुळ खत युनिट या बाबींसाठी शेतकऱ्यांनी त्या-त्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी किरण पाटील यांनी केले आहे. 
फळबाग लागवडी संदर्भात कृषि विभागाने जाहीर केलेले मापदंड.
सदर योजनेमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. वैयक्तिक लाभार्थ्याअंतर्गत संबंधित शेतकऱ्यांच्या शेतावर फळबाग लागवडीची २४ प्रकारची फळझाडे, बांधावर २६ प्रकारची फळझाडे त्याबरोबरच पडीक शेत जनिमीवर २४ प्रकारची फळझाडे घेता येणार असून या योजने अंतर्गत संबंधित शेतकऱ्याकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक असणार आहे. दोन हेकटर पेक्षा कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासंदर्भातील मापदंड हे कृषि विभागाने जाहीर केले आहेत. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्या चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय चंदगड याठिकाणी अर्ज करण्याचे आवाहन कृषि विभागाच्या वतीने केले आहे. 


No comments:

Post a Comment