नाभिक समाजाला शासकीय नियमाचे पालन करून व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

18 May 2020

नाभिक समाजाला शासकीय नियमाचे पालन करून व्यवसाय सुरू करू देण्याची मागणी

माणगाव / प्रतिनिधी
      संपूर्ण देश लॉक डाऊन झाल्यानंतर नाभिक व्यवसायांचे सर्व दुकाने बंद झाली .कारण कोरोणा  हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे याचा फैलाव होईल या भीतीने शासनाच्या आदेशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यवसाय आपला उदरनिर्वाहचे साधन बंद करून घरी बसला आहे .पन्नास हजाराहून अधिक आर्थिक दृष्ट्या मागास असणारा हा समाज व्यवसाय ठप्प झाल्याने भूकबळीचा शिकार बनतो की काय असा प्रश्न निर्माण झाल्याने शासकीय नियमांचे पालन करून हा व्यवसाय सुरू करून द्यावा अशी मागणी नाभिक समाजाच्या वतीने केली जात आहे .
      संपूर्ण देश लॉकडाऊन झाल्यानंतर संसर्गजन्य असा कोरणा रोगाचा प्रसार टाळावा यासाठी  शासकीय नियमाच्या आदेशाने शहरातील व जिल्ह्यातील सर्व नाभिक व्यवसाय बंद झाला असून कोल्हापूर शहरात 1160 तर संपूर्ण जिल्ह्यात 9500 सलून व्यवसायिक आहेत. मालकासह या व्यवसायावर काम करणाऱ्या कामगारांची संख्या 50 हजाराच्या घरात आहे .पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हा व्यवसाय करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या या समाजाकडे स्वतःच्या जमिनी नाहीत. ज्यांच्याकडे आहेत त्या तटपुजा आहेत .हा व्यवसाय करणारे वर्ग A श्रेणीत 12%  ,वर्ग B श्रेणीतील 18%, तर वर्ग C श्रेणीत 70 टक्के यामध्ये 29%  आजही ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धतीचा  समावेश आहे त्याचप्रमाणे जिल्ह्यात आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नाभिक भगिनीच्या ब्युटी पार्लरचा व्यवसाय चालतो .हाताच्या बोटावर  पोट भरणाऱ्या या समाजाकडे शासनाने साफ दुर्लक्ष केल्याने हा समाज भूकबळी  ठरणार की काय असा प्रश्न निर्माण झाल्याने शासकीय नियमाचे  पालन व सर्व अद्ययावत सुविधांचा वापर करून हा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी अशी नाभिक समाजाकडून मागणी होत आहे. सध्या कर्नाटक सरकारने स्वच्छता दूत समजणाऱ्या नाभिक व्यवसायिकाना दरमहा 5 हजार रुपये आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे .त्या तत्वावर महाराष्ट्र सरकारनेही महाराष्ट्रातील नाभिक बांधवांना दरमहा 5 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष सयाजीराव झुंजार व  उपाध्यक्ष कृष्णा बामणे यांनी केली आहे. संपूर्ण ग्रामीण जीवनात राहणारा नाभिकाचा व्यवसाय  बंद पडल्याने अनेक जण आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शिवाय हा व्यवसाय सुरू करण्यासाठी काहिनी भाडेतत्त्वावर मोठे डिपॉझिट  देऊन  दुकान गाळे  कर्ज काढून  सुशोभीकरण केले आहे.त्यामुळे कर्जाच्या भोवर्‍यात सापडणाऱ्याना आर्थिक सहकार्य करून दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद वाडकर, सुनील सपताळे, हणमत जाधव , गुंडू शिवणगेकर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment