तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे बंद असलेली शाखा. |
संपूर्ण देश लॉकडाउन झाल्यामुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुका हा कर्नाटक सीमेवरती असल्याने या तालुक्याचा थेट संपर्क कर्नाटक राज्यातील बेळगाव या शहराशी येतो. सध्या राज्य नाकाबंदी झाल्याने चंदगडचा शेती उत्पादन भाजीपाला शेतातच कुजत असल्याने गडहिगलज कृषी उत्पन्न समितीची तुर्केवाडी येथे बंद असलेली शाखा तात्काळ सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
संपूर्ण देश लॉक डाउन झाला आणि देशाचा सर्व आर्थिक विकास कोलमंडला.कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सीमा नाकाबंदी करण्यात आल्या त्यामुळे चंदगड तालुका हा जरी कोल्हापूर जिल्ह्यात असला तरी व्यापाराच्या दृष्टीने जवळची बाजारपेठ म्हणून त्यांचा थेट संपर्क बेळगाव येथील बाजारपेठशी येतो. शेती उत्पादन झालेल्या सर्व माल वाहतुकीच्या व अंतराच्या दृष्टीने सोयीचे आणि जवळचे असल्याने चंदगडचा शेतकरी माल बेळगाव मार्केटमध्ये पाठवत असतो. पण राज्य सीमा नाकाबंदी झाल्याने चंदगड तालुक्यातील शेती उत्पादन माल शेतात कुजत आहे तर काही व्यापारी नाममात्र किमतीत मालाची उचल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यात महापुरामुळे व आता कोरोणा रोगामुळे आर्थिक चक्र कोलमडले. तुर्केवाडी येथे गडहिग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीची शाखा असून ती बंद अवस्थेत आहे .या समितीच्या आवारात मधपीनी आपला वावर वाढवला असून अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे. इमारतीचा वापरच नसल्याने अनेक ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या असून बाथरूम संडास चे दरवाजे फोडण्यात आलेले आहेत. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या ह्या इमारतीचा उपयोग व्हावा यासाठी या शाखेच्या ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू करून चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment