![]() |
चंदगड येथील नगरसेविका प्रमिला गावडे आपल्या वार्डमधील नागरीकांना होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करताना. |
कोरोना (कोविड १९) या विषाणूंचा प्रादुर्भावामुळे जगासह भारत देशही संकटात आहे. याच्या प्रादुर्भावामुळे जगामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत आहे. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती मजबुत असेल ते लोक याचा मुकाबला करु शकतात. त्यामुळे चंदगड नगरपंचायतीच्या वार्ड क्रमांक १६ च्या नगरसेविका प्रमिला परशराम गावडे यांनी कोरोनाशी लढण्यासाठी सर्वप्रथम आपल्या वार्डामधील नागरीकांना घरोघरी जाऊन रोगप्रतिकाशक्ती वाढविणाऱ्या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप केले.
भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे सर्वांधिक रुग्ण आहेत. हि संख्या दिवसेनदिवस वाढत आहे. चंदगड तालुक्यामध्ये रोज अनेक लोक पुणे-मुंबईसह शहरातून गावी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही धोका वाढला आहे. चंदगड तालुक्यामध्ये आतापर्यंत कोरोनाचे चार रुग्ण सापडले आहेत. भविष्यात हि रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरसेविका प्रमिला गावडे यांनी आपल्या वार्डमध्ये घरोघरी जाऊन रोगप्रतिकाशक्ती वाढविणाऱ्या अरसेनिक अल्बा 30 या इमिनो बूस्टर गोळ्यांचे घराघरात जाऊन 570 लोकांना वाटप केले. तसेच यापूर्वी त्यांनी मास्क, जीवनावश्यक वस्तुंचे किट गरजुंना वाटप केले. त्यांच्या या कार्याचे चंदगड शहरात कौतुक होत आहे. या रोगाशी लढण्यासाठी सरकारी नियम पाळणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने जर सर्वांनी काळजी घेतली तर सर्वजण मिळून या कोरोनाला हद्दपार करू असा विश्वास सी एल न्युजची बोलताना नगरसेविका प्रमिला गावडे यांनी व्यक्त केला.
No comments:
Post a Comment