चंदगड / प्रतिनिधी
रमजानच्या काळात चंदगड मधील व्यापाऱ्यांनी दुकाने चालू करू नयेत अशा आशयाचे निवेदन नुकतेच डॉक्टर इम्तियाज नाईक यांनी दिली आहे.
निवेदनामध्ये त्यानी असे म्हटले आहे की, सद्या रमजानच्या सणानिमित्त उपास महिना चालू आहे. या महिन्याच्या 25 तारखेला रमजान सण आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड मधील दुकाने बंद ठेवावीत. कोरोनामुळे सर्वत्र हाहांकार माजला आहे. सध्या देशभर सर्वांना याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे देशांमध्ये लाँकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रमजानच्या सणादरम्यान सर्व दुकाने बंद ठेवावीत असे निवेदन डॉक्टर इम्तियाज नाईक यानी चंदगडचे तहसीलदार यांना दिले आहे.
No comments:
Post a Comment