कोरोना बाधीत रूग्ण तेऊरवाडीत तर सामसूम कोवाडमध्ये - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2020

कोरोना बाधीत रूग्ण तेऊरवाडीत तर सामसूम कोवाडमध्ये

तेऊरवाडी येथे कोरोना रुग्ण सापडल्याने कोवाड बाजारपेठेत शुकशुकाट होता. 
तेऊरवाडी ( प्रतिनिधी ) 
       काल तेऊरवाडी ( ता. चंदगड ) येथे दोन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्याने किणी -
कोवाड हा कर्यात भाग हादरला .केवळ हाकेच्या अंतरावर असणाऱ्या व कोवाडशी नित्याचा संबध असणाऱ्या तेऊरवाडीतील या घटनेचा थेट परिणाम कोवाड बाजारपेठेवर झाल्याने काल दि २१ पासून कोवाड बाजारपेठे बंद करण्यात आली आहे .
       तेऊरवाडी गावामध्ये लॉक डाऊन नंतर १३५ जण चाकरमानी दाखल झाले आहेत . या सर्वाना मराठी विद्यामंदिर तेऊरवाडी , तेऊरवाडी माध्यमिक विद्यालय , विवेकानंद इंग्लिश मेडिअम स्कूल कोवाड , आश्रमशाळा कोवाड येथे संस्थात्मक कॉरंटाईन करण्यात आले आहे . तरी पण जागा अपूरी पडत असल्याने ज्यांच्या स्वॅबची तपासणी झाली आहे अशा काहीना होम कॉरंटाईन केले आहे . यापैकी मुंबईवरून १३ तारखेला गावी आलेल्या पैकी दोघांचे स्वॅब अहवाल काल पॉझिटीव्ह आले . या बरोबरच दोन दिवसा पूर्वी चिंचणे -कमलवाडी येथे सापडलेला कोरोना पेशन्ट सुद्धा भागातील आहे . यामुळे तेऊरवाडीसह कोवाड गावामध्ये सामसूम झाली .तात्काळ आज दोन्ही गावातील  सर्व दूध संस्था , बँका , दूकाने बंद ठेवण्यात आल्या आहेत . सायंकाळी पाच वाजेपर्यंत तेऊरवाडीला मंडल अधिकारी श्री जिरनाळे , तलाठी दयानंद कांबळे यानी भेट देऊन सूचना केल्या .

No comments:

Post a Comment