भटक्यांच्या मदतीला धावून आले प्रकाश बोकडे! इकडे तिकडे चोहीकडे,!! लॉक डाऊन सगळीकडे - चंदगड लाईव्ह न्युज

22 May 2020

भटक्यांच्या मदतीला धावून आले प्रकाश बोकडे! इकडे तिकडे चोहीकडे,!! लॉक डाऊन सगळीकडे

भटक्या कुटुंबांना मदत देताना प्रकाश बोकडे.
चंदगड / प्रतिनिधी
लॉक डाऊन काळात अनेकांच्या गैरसोयी झाल्या. अनेक ठिकाणी अनेक लोक अडकून पडले. भटके-विमुक्त व अशा अनेकांवर  उपासमारीची वेळ आली .कोरोना सारख्या महामारी च्या संकटातून मानव जातीचे रक्षण कर,कोरोना ला हद्दपार कर ,असे देवाजवळ घातलं साकडे . अर्थातच बी डी विद्यालयाचे प्राध्यापक प्रकाश बोकडे!!"जे का रंजले गांजले! त्यासी म्हणे जो आपुले! तोचि साधु ओळखावा , देव तेथेचि जाणावा !! "असा हा अवलिया प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे हे निष्पाप आणि निष्कपट व्यक्तिमत्व सौ व श्री प्राध्यापक बोकडे* दाम्पत्यांनी हलकर्णी फाटा, पाटणे फाटा या ठिकाणी असणाऱ्या भटक्या जमातीला *जीवनावश्यक किट*  पुरवून पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन घडवले आहे आहे,महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य म्हणून प्राध्यापक प्रकाश बोकडे  यांची ओळख आहे .बागिलगे परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना व सामाजिक उपक्रमाला वेळोवेळी मदतीचा हात पुढे करणारे प्राध्यापक प्रकाश बोकडे कुटुंबीय यांचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

No comments:

Post a Comment