समृद्ध कांबळे संस्कृती कांबळे |
सर्व स्तरातून कोरोनाबाबत जागृती होऊ लागली आहे. ग्रामीण भागातील जनतेतूनही या महामारीबाबत प्रबोधन सुरू आहे. दरम्यान मुळचा कोरज (ता. चंदगड) व सध्या नेसरी (ता. गडहिंग्लज) समृद्ध राजाराम कांबळे आणि संस्कृती राजाराम कांबळे या भावंडांनी गेले दोन महिने लॉकडाऊन काळात रोज सोशल मीडियाच्या माद्यमातून प्रेक्षकांचे कोरोना जागृतीसह मनोरंजनही करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे तालुक्यात स्वागत होत आहे.
गेले द्यायचंच राहून, हरि भजना विण काळ, '' भय इथले संपत नाही, रुणुझुणू रूणू रे भ्रमरा ",. जिंदगी हर कदम एक नयी जंग है, हिच आमुची प्रार्थना ", '' सुबह सबेरे लेकर तेरा नाम प्रभू, " श्रीरंगा कमलाकांता, अशा प्रकारे दोघांनी प्रत्येकी ५० पेक्षा जास्त गीते सादर केली आहेत. समृद्ध व संस्कृती या दोन्ही भावंडांनी टीव्ही चॅनेललाही संगीत सादरीकरण केले आहे. याच काळात डॉ. सदानंद पाटणे (गडहिंग्लज) यांनी शब्दबद्ध केलेल्या कव्वालीसाठी समृद्धने चाल, म्युझिक प्रोग्रॅमर आणि अरेंजर म्हणून काम केल आहे. प्राचार्य मच्छिंद्र बुवा यांच्याकडे समृद्ध 13 वर्षा पासून तर समृद्धि 5 वर्षा पासून शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहे. ही भावंडे कोवाड (ता. चंदगड) येथील कला महाविद्यालयाचे मराठीचे प्रा. डॉ. आर. डी. कांबळे यांची मुले आहेत.
समृद्ध याने दुबई येथे सांस्कृतिक महोत्सवात शास्त्रीय गायनात प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकावले आहे. तर २०१९ ला राज्यस्तरीय युवा संगीतरत्न पुरस्कार तसेच केंद्र सरकारकडून शास्त्रीय गायनासाठी स्कॉलरशीप प्राप्त केली आहे. तसेच दिल्ली येथे महात्मा गांधी महोत्सवात पंतप्रधान यांच्या उपस्थित त्याचा गायन कार्यक्रम झाला आहे. तर संस्कृती ही 'सूर नवा, ध्यास नवा, या कलर्स चॅनेल वरिल स्पर्धेत सेकंड राऊँड पर्यंत गेली आहे.
2 comments:
Hard work of Samruddh and Sanskruti is appreciated.
Great Samrudhi & Samarth.
Post a Comment