बेळगावच्या एक्स्ट्रीम सिक्युरिटीकडून चंदगड पोलिसांना फेसगार्ड - चंदगड लाईव्ह न्युज

16 June 2020

बेळगावच्या एक्स्ट्रीम सिक्युरिटीकडून चंदगड पोलिसांना फेसगार्ड

शिनोळी : पोलिसांना फेसगार्ड वाटप करताना संदीप अष्टेकर, कृष्णा पाटील, रघुनाथ देसाई, अड़. मनिष जाधव आदी.
कागणी : सी एल वृत्तसेवा
       बेळगाव येथील एक्स्ट्रीम सिक्युरिटी सोल्युशन कंपनीकडून बाची (ता. बेळगाव), शिनोळी (ता. चंदगड) येथील आंतर राज्य चेक पोस्ट व चंदगड  पोलिस स्टेशन मधील पोलिसांना कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर फेसगार्ड व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. 
       पोलिसांनाही कोरोनाचा धोका वाढला असल्याने एक्स्ट्रीमचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रजीत प्रधान यांनी फेसगार्ड वाटप करण्याचा निर्णय घेतला. साहित्य वाटप प्रसंगी एक्सट्रीमचे सीईओ संदीप अष्टेकर म्हणाले,  सध्या आंतरराज्य वाहतूक सुरू झाली असून पोलिसांना शेकडो नागरिकांच्या संपर्कात जावे लागत आहे यामुळे पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला आहे. यामुळे पोलिसांचे कोरोनापासून संरक्षण होणे गरजेचे आहे. यावेळी एक्सट्रीम चे कायदा सल्लागार अड़. मनिष जाधव, शिनोळी शाखेचे कृष्णा पाटील, रघुनाथ देसाई यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment