हलकर्णी फाटा : आ. राजेश पाटील यांचे अभिष्टचिंतन करताना राजू पाटील, सुरेंद्र अनगोळकर, अमोल देसाई, जोतिबा पाटील. |
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस रविवारी दिनांक 14 रोजी विविध उपक्रमाने साजरा झाला.
हलकर्णी (ता. चंदगड) येथे आयोजित कार्यक्रमात बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमदार पाटील यांचे अभीष्टचिंतन करण्यात आले. यावेळी बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजू पाटील, बेळगाव महानगरचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर, बेळगाव जिल्हा सरचिटणीस अमोल देसाई, बेळगाव जिल्हा उपाध्यक्ष जोतिबा पाटील यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment