अभिनेता दिग्दर्शक मिलिंद बाचल यांची यशस्वी वाटचाल - चंदगड लाईव्ह न्युज

27 June 2020

अभिनेता दिग्दर्शक मिलिंद बाचल यांची यशस्वी वाटचाल

मिलिंद बाचल 

चंदगड/ प्रतिनिधी
            सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातून दिग्दर्शक म्हणून उदयास आलेल्या मिलिंद बाचल यांचे शिक्षण मास कम्युनिकेशन झालं असून त्याच बरोबर  बीए, एम.ए झालं आहे.पदवी घेत त्यांनी कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ मध्ये 6 वर्ष एम .पी .एससी  करत असताना कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये अनेक चित्रपटाच्या ऑडिशन दिल्या आणि तेथूनच त्यांच्या चित्रनगरीचा प्रवास सुरु झाला.अनेक शॉर्टफिल्म काढल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित शिवगीताची निर्मिती केली.
शशिकांत पेडणेकर

मध्यंतरीच्या काळात अनेक मोठ्या चित्रपटात काम केल्यानंतर स्वतः दिग्दर्शक म्हणून सुरुवात केली 2019 मध्ये 3 सुपरहिट गाण्याची निर्मिती व दिग्दर्शन केले.ऑडिओ निर्मिती  पासून दिग्दर्शक, कॅमेरामन, कला दिग्दर्शक, अभिनय, वेशभूषा, संकलन आदी मिलिंद बाचल यांनी केलं आहे. नुकतचं सुमित म्युझिक वर तुला बोलेन आय लव्ह यु . हे त्यांनी गाणं रिलीज केल.हे गीत लवकरच टीव्ही चॅनेलला लावायचा त्यांचा मानस आहे.जिल्हा परिषद रायगड मधील नौकरी सांभाळत शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी या क्षेत्रात ते काम करतात. एकाच वर्षात 3 सुपरहिट गाणे दिल्यानंतर लवकरच मिलिंद  नवीन गाण्याची निर्मिती दिग्दर्शन करत आहेत. या कामासाठी  चंदगडचे जेष्ठ कलाकार शशिकांत पेडणेकर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन त्यानां लाभले.

No comments:

Post a Comment