चंदगड / प्रतिनिधी:
न्हावेली ता.चंदगड येथे गावामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी रेशनधान्य चोरीला जाताना पोलिस व ग्रामस्थ यानी देसाईवााडी येथे गाडी पकडली होती.त्यामुळे वागदादेवी महिला बचत गट या रेशनधान्य दुकानावर गुन्हा नोंद करण्यात आला होता.त्यानंतर या दुकानाचा परवाना रद्द करण्यात आला. चंदगड तहसीलदारांच्या आदेशानुसार न्हावेली ग्रामस्थांची गैरसोई होऊ नये यासाठी या गावातील धान्य वितरण कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गटामार्फत करण्यात आले.त्यामुळे येथील लोकांची गैरसोय झाली नाही.
कोकरे येथील जीवनप्रकाश महिला बचत गटामार्फत व्यवस्थित आणि सुरळीतपणे धान्य वाटप न्हावेली गावामध्ये करण्यात आले ,रेशनधान्य वाटप करताना लोकांना पावती मिळाली,तसेच दरामध्ये तफावत नसल्याने सर्व न्हावेली ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.यावेळी अध्यक्ष रमेश किरमटे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment