शिवभोजन थाळी केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

21 June 2020

शिवभोजन थाळी केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
            गरीब व गरजु व्यक्तींना स्वस्त दरात शिवभोजन उपलब्ध करून देणेसाठी शिवभोजन थाळी केंद्र हलकर्णी फाटा  येथे सूरू करण्यात येणार आहे. याबाबत इच्छूकानी अर्ज करावे असे आवाहन तहसिलदार विनोद रणवरे यानी केले आहे.  शिवभोजन थाळी चे चंदगड तालुक्यासाठी 200 चे उदीष्ठ देणेत आलेले असुन चंदगड तालुकेमध्ये हलकर्णी फाटा येथे 50 थाळयांचे शिवभोजन चालु करण्याच्या दृष्टीने सद्यस्थितीत सुरु असलेल्या खानावळ, एनजीओ, महिला बचत गट, भोजनालय, रेस्टॉरंट अथवा मेस यांचेकडुन दिनांक 24.06.2020 अखेर अर्ज मागविणेत येत असुन या बाबतचा जाहीरनामा काढणेत आलेला आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकानी  तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा.No comments:

Post a Comment