तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी चंदगड तालूक्यात ठिकठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. पण या चेकपोष्ठवर शिक्षण विभागाकडील शिक्षकांच्या नेमणूका मध्ये खेळखंडोबा झाला आहे. पुन्हा - पुन्हा त्याच शिक्षकांच्या नेमणूका केल्याने संबधीत शिक्षकामध्ये असंतोष निर्माण झाला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चंदगड तालुक्यात सात ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत . यामध्ये तेऊरवाडी, दड्डी, होसूर, शिनोळी, कानूर, कोदाळी, मलगेवाडी येथील तपासणी नाक्यावर शिक्षण, महसूल, आरोग्य, कृषी, संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सुरवातीच्या टप्यात या कर्मचाऱ्यानी १२ तास ड्यूटी केली आहे. त्यानंतर १ जूनपासून ८ तास ड्यूटी करण्यात आली आहे. १६ जूनपासून पून्हा नविन नेमणूका या तपासणी नाक्यावर करण्यात आल्या आहेत. पण या नेमणूकामध्ये पूर्वीच्याच काही शिक्षकांच्या तीसऱ्यांदा नेमणूका करण्यात आल्याने या शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. चंदगड तालूक्यात ६५ हून अधिक माध्यमिक विद्यालये आहेत. असे असतानाही काही ठराविक विद्यालयातील च शिक्षकांच्या पून्हा -पून्हा नेमणूका करण्यात येत आहेत. असे न करता तपासणी नाक्याच्या जवळपासच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकांच्या नेमणूका केल्यास पूर्वी काम केलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडणार नाही. याची दखल चंदगड तालूक्यातील संबधीत प्रशासनाने तात्काळ घेण्याची मागणी तपासणी नाक्यावरील कर्मचाऱ्यां कडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment