आमरोळी येथील युवक बेपत्ता - चंदगड लाईव्ह न्युज

17 June 2020

आमरोळी येथील युवक बेपत्ता

राजेश अशोक मुधोळ
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
          आमरोळी (ता. चंदगड) येथील राजेश अशोक मुधोळ (वय-20, रा. आमरोळी, चंदगड) हा युवक बेपत्ता झाल्याची फिर्याद श्रीमती शोभा अशोक मुधोळ यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
          यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - राजेश मुधोळ हा २२ जानेवारी २०२० रोजी सकाळी साडेदहा वाजता रहात्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. तो अद्याप आलेला नाही. राजेश मुधोळ हा घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेलेला आहे. त्याची मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली असता कोठेही तो मिळून आलेला नाही. त्यामुळे तो बेपत्ता झाल्याची फिर्याद श्रीमती शोभा मुधोळ यांनी चंदगड पोलिसात दिली आहे. ४ मे २०२० रोजी राजेश बेपत्ता असल्याची फिर्याद चंदगड पोलिसात दाखल आहे. हा युवक कोणालाही आढळून आल्यास चंदगड पोलीस ठाणे ०२३२०२२४१३३ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन बी. एस. महापुरे यांनी केले आहे.
          राजेशचे  वर्णन पुढील प्रमाणे - उंची पाच फूट चार इंच, रंगाने गव्हाळ, अंगाने मध्यम, नाक सरळ, केस काळे बारीक, अंगात गुलाबी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, मराठी व कन्नड भाषा बोलतो.

No comments:

Post a Comment