चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता अचल कॅश्यु प्रायव्हेट लिमिटेड तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील कंपनीकडून पि. पी. इ. कीट वितरण करण्यात आले. कोरोना संसर्गाच्या महामारी पासून नागरिकांना वाचवण्यासाठी देश व राज्यपातळीवर सध्या मोठया प्रमाणात काम सुरू आहे. या भयानक परिस्थितीला आरोग्य अधिकारी कर्मचारी पोलिस खाते व महसूल खाते या परिस्थितीला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी अश्या कीटची गरज होती. ही गरज लक्षात घेवून अचल कॅश्यू या कंपनीने तहसीलदार विनोद रणवरे यांच्याकडे 50 पिपिइ किट सुपूर्द केल्या. आणखीन दानशूर व्यक्तींनी अशा पद्धतीचे आरोग्य खात्यांना हातभार लावण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. यावेळी कर्मचारी चंद्रकांत गावडे, संदीप गावडे व नामदेव कदम उपस्थित होते.
No comments:
Post a Comment