उत्कर्ष गणेशोत्सव मंडळाची मुर्ती. |
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे भविष्यातही याचा धोका संभवतो. त्यामुळे चंदगड येथील उत्कर्ष गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सोशल डिस्टनस पाळून गणेशोत्सव मंडळाचा साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यता आल्या.
कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना संसर्गाच्या महामारी पासून नागरिकांना वाचवण्यासाठी देश व राज्यपातळीवर सध्या मोठया प्रमाणात काम सुरू आहे. या भयानक परिस्थितीला आरोग्य अधिकारी कर्मचारी पोलिस खाते व महसूल खाते या परिस्थितीला सामोरे जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोरोना पासून वाचण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा होती. २१ फुटी , गणेश मूर्ती, लायटिंग देखावे, महाप्रसाद इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात. पण कोरोना मुळे आर्थिक परिस्थिती बिघडल्याने नागरिकांची अडचणीत आहेत. त्यामुळे वर्गणी गोळा करून हा सण साजरा करणे शक्य नाही . मंडळाच्यावतीने आज मोठा निर्णय घेण्यात आला. इतर चंदगड तालुक्यातील मंडाळीनीही साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा असे आव्हान करण्यात आले. यावेळी गोपाळ राजापूरकर,संस्थापक अध्यक्ष राजीव चंदगडकर, दिलीप शेलार, नगरसेवक बाळासाहेब हळदणकर,माजी ग्रामपंचायत सदस्य सुधीर पिळणकर ,राजू दांडेकर देवेंद्र कुडतरकर, सुरेश बुरुड, विक्रांत बांदिवडेकर, रवि गडकरी, नीलेश पिळणकर,
मंदार आवटे,रोहन गवस ,विलास राठोड रवी शिर्के , वृंदन दड्डीकर, बाबू कांबळे ,सुरज लाड , गौरव दळवी ,जय चंदगडकर , श्रीकांत बुरुड , जय बुरुड ,अभी खोडबाळे, बुरुड उपस्थित होते.
No comments:
Post a Comment