जनता विद्यालय तुर्केवाडी दहावीच्या निकालात मुलींची बाजी पहिल्या पाचमध्ये मुलींचा दबदबा; शाळेचा 100% निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

जनता विद्यालय तुर्केवाडी दहावीच्या निकालात मुलींची बाजी पहिल्या पाचमध्ये मुलींचा दबदबा; शाळेचा 100% निकाल

जनता विद्यालय, तुर्केवाडी
तुर्केवाडी (प्रतिनिधी) : 
          दहावीच्या निकालात तुर्केवाडीच्या जनता विद्यालयाने उत्कृष्ठ यश मिळवत शाळेचा शंभर टक्के निकाल लागला आहे. त्यात मुलींनी बाजी मारली असून पहिल्या पाच मुलीं डिस्टींगक्शनमध्ये पास झाले आहेत. यानिमित्त संस्थेचे चेअरमन मा. आर.एन पाटील सर व संस्था सचिव मा. जी.एन पाटील सर यांनी संस्थेच्यावतीने सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व शिक्षकांचे विशेष कौतुक केले आहे.
          यावर्षी इयत्ता दहावीसाठी विद्यालयातुन एकूण 62 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट होते. यापैकी डिस्टींगक्शनमध्ये (विशेष प्राविण्य) 39 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर फर्स्ट क्लासमध्ये ( प्रथम श्रेणी) 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून सेकंड क्लासमध्ये (व्दितीय श्रेणी) 5 विद्यार्थी पास झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक मा. पी.एन यळ्ळूरकर सर, पर्यवेक्षक मा. एस.ए पाटील सर व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सर्व विद्यार्थी, पालकांचे यावेळी शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
  प्रथम- मानसी गावडे 93.80%
द्वितीय-अंकिता शिंदे 93.60%
तृतीय- महमदकैस मुल्ला 91.60%
चतुर्थ- समिक्षा ओऊळकर 91.20%
पाचवा- करुणा फर्जंद 90.40%
पाचवा- समृद्धी गावडे 90.40%

No comments:

Post a Comment