बारावीच्या गुणपत्रिकांचे 31 जुलै पासून वितरण - कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव एस.एम. आवारी - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

बारावीच्या गुणपत्रिकांचे 31 जुलै पासून वितरण - कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव एस.एम. आवारी

दौलत हलकर्णी (जिल्हा माहिती कार्यालय):                            
           फेब्रुवारी/मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी च्या गुणपत्रिकांचे दि. 31 जुलै रोजी दुपारी 3 वा. पासून संबंधित महाविद्यालयात वितरण करण्यात येणार असल्याची माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव एस.एम. आवारी यांनी दिली.
        उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. 12 वी) फेब्रुवारी/मार्च 2020 च्या गुणपत्रिका सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दि. 31 जुलै रोजी सकाळी 11 वा. त्यांना नेमून दिलेल्या वितरण केंद्रावरून वाटप करण्यात येणार आहेत. संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांनी 31 जुलै रोजी दु. 3 वा. पासून विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेनुसार व सोईनुसार शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व नियमांचे व सुचनांचे पालन करून गुणपत्रक वितरण करावे. विद्यार्थ्यांना विशिष्ठ तारखेलाच गुणपत्रक घेऊन जाण्याबाबत आग्रह धरू नये. कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पालक/विद्यार्थी यांची एकाच वेळी गर्दी होणार नाही याची दक्षता घेऊन गुणपत्रकांचे वाटप करण्याचे आवाहनही श्री. आवारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment