शिरोली येथे जैन समाजाच्या वतीने जैन मंदिरामधील हॉल 'सिमंधर कोविड केअर सेंटर' आज कार्यान्वित - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

शिरोली येथे जैन समाजाच्या वतीने जैन मंदिरामधील हॉल 'सिमंधर कोविड केअर सेंटर' आज कार्यान्वित

शिरोली येथील 'सिमंधर कोविड केअर सेंटर' 
दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
        कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण आपण सर्वांनी सुद्धा अशा पद्धतीने नियोजन करून आपल्या गावांमध्ये, शहरातील अपार्टमेंटमध्ये  विलगीकरण करून  सौम्य लक्षणे अथवा लक्षणे नसणाऱ्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुढे यावे. 
      करवीर तालुक्यातील वडणगे गावामध्येसुद्धा या पद्धतीचा उपक्रम हाती घेतला असून आता गावातील अशा रुग्णांवर गावातच उपचार* केले जाणार आहेत. हे दोन्ही उपक्रम कोरोनाशी लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे आणि कौतुकास्पद पाऊल आहे. माझी खात्री आहे, आपण सर्व कोल्हापूरकर मिळून या कोरोनाच्या लढाईमध्ये नक्की यशस्वी होऊ. असे मत पालकमंत्री आम. सतेज पाटिल यांनी व्यक्त केले.
        यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, मनपा आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, शिरोलीचे सरपंच शशीकांत खवरे, उपसरपंच उत्तम पाटील, माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण, तसेच जैन समाज ट्रस्टचे जितेंद्र गांधी, भरत ओसवाल, हिम्मत ओसवाल, अमर गांधी, राजेंद्र ओसवाल, कुमार राठोड, प्रवीण ओसवाल, प्रकाश राठोड, भरत ओसवाल, दिलीप गांधी, नरेंद्र पोरवाल तसेच विठ्ठल पाटील (आबा ) सुरेश यादव, जोतीराम पोर्लेकर आदी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment