कोवाड येथील कला महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

कोवाड येथील कला महाविद्यालयाच्या वतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

कोवाड / सी एल वृत्तसेवा
      कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव पाहता शिक्षण क्षेत्राबरोबरच सर्वच क्षेत्राना मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.12 वी चे निकाल नुकतेच जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी कोवाड मधील कला महाविद्यालयामार्फत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. व्ही.आर.पाटील यांनी दिली आहे. या महामारीमुळे सर्वांसमोर आर्थिक ,मानसिक, शैक्षणिक, शारिरीक संकट उभे ठाकले आहे, अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता यावे यासाठी सर्वोदय शिक्षण संस्थेच्या, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, कोवाड, ता. चंदगड यांचेमार्फत शासनाच्या आदेशानुसार ऑनलाईन प्रणालीच्या आधारे प्रवेश प्रक्रियेला सुरू केली आहे.त्यानुसार विद्यार्थ्याना महाविद्यालयाने १२ वी उत्तीर्ण झालेल्या व  एफ.वाय., एस.वाय आणि टी.वायच्या विद्यार्थाच्या प्रवेश प्रक्रिया 'ऑनलाईन ' पद्धतीने भरून घेण्यास सुरुवात केली आहे .
      यासाठी  महाविद्यालयामार्फत खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपली संपूर्ण माहिती दिलेल्या फॉर्ममध्ये भरुन Submit वर क्लिक करावे. आणि आपला प्रवेश निश्चितत करण्यासंदर्भात आवाहन केले आहे.
https://forms.gle/85jU4GEnKDe89aJh9 त्याचबरोबर काही शंका असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. Dr. A.K.Kamble: 9420608729, Mr.S.J.Patil: 9738506200, Mr.M.S.Gholase:8805873395, Mrs.A.P.Joshi: 9423135125.

बातमीदार - संजय पाटील, कोवाड प्रतिनिधी

No comments:

Post a Comment