लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर कोवाड बाजारपेठेत शुकशुकाट,विनामास्क ,डबल सीट,अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा - चंदगड लाईव्ह न्युज

20 July 2020

लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर कोवाड बाजारपेठेत शुकशुकाट,विनामास्क ,डबल सीट,अनावश्यक फिरणाऱ्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा

कोवाड बाजारपेठेत पोलिसांकडून अशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आला.
कोवाड / सी एल वृत्तसेवा
कोल्हापुरात मध्यरात्रीपासून कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे.याबाबतची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केली होती.गेले दोन दिवस खरेदीसाठी गजबजलेल्या कोवाड ( ता. चंदगड ) बाजारपेठेने मोकळा श्वास घेतला अन...आज सकाळपासूनच बाजारपेठेत शुकशुकाट पहायला मिळाला.
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबधित रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर सोमवार दि 20 जुलै ते 27 जुलै पर्यंत कडक लॉकडाऊन ची घोषणा करण्यात आली आहे.चंदगड तालुका स्थानिक रुग्ण संख्येच्या एकूणच आकडेवारीमध्ये जिल्ह्यात अग्रस्थानी आला असून याठिकाणी विशेष खबरदारी घेण्याची खरी गरज निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीत कर्यात भागासाठी मोठी असणाऱ्या कोवाड बाजारपेठेत होणारी गर्दी चिंतेचा विषय ठरत होता.त्यात रविवारी दुपारी आलेल्या अहवालामध्ये कोवाडमधील दोन जणांचे अहवाल हे पॉजटीव्ह आल्यामुळे याठिकाणचा परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी विजया पांगारकरांच्या आदेशानुसार जाहीर केला असून  गावच्या सीमा  सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सकाळच्या सत्रात कोवाड पोलिसांकडून विनामास्क,डबलसीट,अनावश्यक फिरणाऱ्या वाहनधारकाबरोबरच नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला.त्यामुळे दिवसभर याठिकाणी शुकशुकाट पहायला मिळाला.

बातमीदार - संजय पाटील, कोवाड प्रतिनिधी


फोटो - कोवाड बाजारपेठेत पोलिसांकडून अशा प्रकारे बंदोबस्त ठेवण्यात आला.

No comments:

Post a Comment