संजय गांधी विद्यालयाचा करण पाटील दहावी परिक्षेत ९९.४०% गूण मिळवून ग्रामीण विभागात जिल्ह्यात प्रथम - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

संजय गांधी विद्यालयाचा करण पाटील दहावी परिक्षेत ९९.४०% गूण मिळवून ग्रामीण विभागात जिल्ह्यात प्रथम

करण विजय पाटील
चंदगड / प्रतिनिधी
            नागनवाडी (ता. चंदगड) येथील संजय गांधी विद्यालयाचा विद्यार्थ्यी करण विजय पाटील याने दहावी परिक्षेत ९९.४०% गुण मिळवून जिल्ह्यात ग्रामीण विभागात  प्रथम क्रमांक पटकावला.  विद्यालयाचा  १००% निकाल लागला आहे. परीक्षेला एकूण १०८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १०८ विद्यार्थी पास झाले असून ९०% च्या वर गुण संपादित केलेली एकूण विद्यार्थी २९ आहेत.
           विद्यालयात अनुक्रमे कु.श्रुती दत्तात्रय येसणे ९७.६०%, कु. निकिता संजय सरनोबत ९७.६०, कु. भुमिका केदारी निकम ९७.४०, कु. मेघा तुकाराम मोटर ९७.००, कु. पुर्वा श्रीकांत भिसे ९५.४०, अनुपम विजय कांबळे ९५.२०, कु. सोनाली रमेश सुतार ९४.६०, साहिल विजय कुमार ९४.६०, कु. पुजा पुंडलिक पाटील ९४.००, आदित्य दयानंद पवार ९३.८०,कु. सानिका संजय पाटील ९३.६०, निखिल नंदु गोरल ९३.४०, किरण जनार्दन पाटील ९३.४०, कार्तिक प्रकाश बागडी ९२.८०, कु.सेजल बापू चिपकर ९२.४०, पियुष युवराज पाटील ९२.२०, कु.नुतन मारुती सरनोबत ९१.४०, कु.पायल हणमंत गावडे ९१.४०, कु.उज्वला हरिबा पाटील ९१.४०, कु.अंजली विष्णू गावडे ९१.२०, कु. श्रुती सुनील गुरव ९१.२०, प्रदीप रवळू मेलगे ९१.००, संकेत सुभाष हजगुळकर ९०.८०, दीपक संजय कोंडुसकर ९०.६०, सुशांत निवृत्ती जाधव ९०.४०, कु. सायली चंद्रकांत गुरव ९०.४०, सुजय नंदकुमार चांदेकर ९०.२०, आप्पाजी दशरथ पाटील ९०.०० या विद्यार्थ्यांनी नंबर मिळवले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना, शाळेचे मुख्याध्यापक एम. आर. भोगुलकर, उपमुख्याध्यापक कृष्णा भोगुलकर या सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. तर सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


No comments:

Post a Comment