साकीब नाईकचे सुयश, दिलेल्या खात्री प्रमाणे मिळाले गुण - चंदगड लाईव्ह न्युज

29 July 2020

साकीब नाईकचे सुयश, दिलेल्या खात्री प्रमाणे मिळाले गुण

साकीब नाईक
चंदगड / प्रतिनिधी
       चंदगड येथील रहिवासी पण सघ्या व्यवसायानिमित्त कुडाळ येथे वास्तव्यास असलेले ईसाक उर्फ बाबा नाईक यांचा मुलगा शाकीब याने इयत्ता दहावीच्या परिक्षेत ८३टक्के गुण मिळवून आपल्या आई वडिलांना दिलेल्या शब्दाला पात्र ठरला.                                 
       शाकीब हा ओरोस येथील डॉन बाँक्सो  या  इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. विशेष म्हणजे  शाकीब यांचे वडील कुडाळ येथे वास्तव करून आहेत.ते काजु प्रक्रिया उद्योजक आहेत. त्यांचा सहा महिण्या दरम्यान एक अपघात झाला होता त्यात त्यांच्या  पायाला गंभीर मार लागल्याने ते बेडरेस्टवर कित्येक महिने होते. घरच्या आशा वातावरणात ही शाकीब याने आपल्या आई वडिलांना आपण जिद्दीने आभ्यास करून ऐंशी ते नव्वद टक्के मार्क मिळवणारच अशी खात्री लेखी स्वरूपात दिली होती. लिहलेला कागद रोज सर्वांना दिसावा अशा ठिकाणी लावला होता.आई वडिलांना दिलेल्या वचनाची आपण पुर्तता केल्याने आपल्याला खुपच समाधान वाटत आहे अशी प्रतिक्रिया शाकीबने व्यक्त केली. प्राचार्य रीबेरो व ईतर सर्व शिक्षकांनी बहुमोल मार्गदर्शन केल्याबद्दल शाकीबच्या वडिल ईसाक उर्फ बाबा नाईक यांनी आभार व्यक्त केले.No comments:

Post a Comment