सकल मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी उमगाव येथील संजय गावडे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

28 July 2020

सकल मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी उमगाव येथील संजय गावडे यांची निवड

संजय गावडे
                                             संजय गावडे



दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
          सकल मराठा महासंघ महाराष्ट्र राज्याच्या चंदगड तालुका अध्यक्षपदी संजय भिवाजी गावडे यांची निवड करण्यात आल्याचे सतिश पेडणेकर ( प्रदेश संघटक), संतोष खामकर (प्रदेश कार्याध्यक्ष) व कोल्हापुर जिल्हा महीला अध्यक्ष सौ. शोभा कोकीतकर यांनी प्रसिद्धिस दिले आहे.
            आगामी काळात मराठा समाजाच्या दृष्टीने संघणात्मक काम मजबुत करण्यासाठी वाडी, वस्ती, गाव, शहर, तालुका,जिल्हा व राज्यात वाढीसाठी एकत्रीत का कार्यकरुण समाजासमोर येणाऱ्या अडचणींना सोडवण्यासाठी प्रत्येक तालुक्यात अध्यक्ष व कमिटीची नेमणुक करणार असल्याची माहीती सौ. कोकीतकर यांनी दिली. श्री. गावडे हे सैन्यदलातुन निवृत्त होऊण सतत समाजासाठी योगदान देण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या निवडीमुळे चंदगड तालुक्यात सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment