अडकूरचा प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश रद्द - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2020

अडकूरचा प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश रद्द

                                                अडकूर गावातील सुनसान असलेला शिवाजी चौक

तेऊरवाडी - सी .एल. वृत्तसेवा
     गेले महिनाभर प्रतिबंधीत क्षेत्र असणाऱ्या अडकूर ( ता. चंदगड ) चा प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश आज प्रांताधिकारी विजया पांगारकर यानी रद्द  केला.
          अडकूरमध्ये २५ जून रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता .पहिल्याच रूग्णाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने प्रशासनासमोर मोठी अडचण निर्माण झाली होती. यानंतर येथे या मृत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या  एकामागोमाग एक अशा १७ जनाणा कोरोणाची लागण झाली होती. त्यामूळे अडकूर बाजारपेठ प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले होते. प्रथम रुग्ण सापडल्यानंतर २८ दिवस संपूर्ण बाजारपेठ व गावात कडक लॉक डाऊन होता. या २८ दिवसात नवीन एकही रूग्ण सापडला नसल्याने प्रतिबंधीत क्षेत्राचा आदेश आज मागे घेण्याचा आदेश प्रांताधिकारी यांनी दिला . पण लॉक डॉऊनच्या इतर नियमांचे पालन करणे सर्वाना बंधनकारक असणार आहे. गेले महिनाभर बंद असलेली अडकूर गावातील  बाजारपेठ आता तरी नियमांचे पालन करणार काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment