राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर चौकात वाढदिवस साजरा - संग्रामसिंह कुप्पेकर - चंदगड लाईव्ह न्युज

27 July 2020

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नेसरी येथे सरसेनापती प्रतापराव गुजर चौकात वाढदिवस साजरा - संग्रामसिंह कुप्पेकर

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवस व मास्क वाटप कार्यक्रमावेळी चंदगड  विधानसभा शिवसेना संघटक संग्रामसिंह कुप्पेकर व पदाधिकारी व सैनिक.

चंदगड / प्रतिनिधी
    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे सरसेनापती प्रतापराव गुजर चौकामध्ये चंदगड विधानसभा मतदार संघाचे शिवसेना संघटक संग्रामसिह कुप्पेकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना पासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी मास्कचे वाटप करणेत आले.
   या कार्यक्रम निमित्य चंदगड विधान सभा मतदार संघाचे शिवसेनेचे पदाधिकारी राजू रेडेकर, प्रशांत नाईक, मलिकार्जुन तेली, अशोक खोत, दिनेश कुंभिरकर, अवधूत पाटील, बाबूराव नाईक, महादेव पाटील, युवराज दळवी, धनाजी नाईक, सतीश निर्मळकर, सुरेशराव देसाई, सागर शेलार, अमोल नार्वेकर, अरुण किल्लेदार, अशोक कमते, दिगंबर पाटील, विलास हल्याळी, संजय कांबळे, संजय पाटील, प्रसाद हल्याळी, मोहसीन वाटंगी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment