शिरसंगी येथे गणेश मूर्तीकार रंगकाम करताना.
|
शिरसंगी सह किणे ( ता. आजरा ) परिसरातील मूर्तिकार गणेशोत्सव आठ दिवसावर येऊन ठेपलेने गणेश मूर्तीवर अखेरचा रंगाचा हात फिरवत आहेत.सिरसंगी येथील कुंभारवाडा व सुतारवाडा रंगकामासाठी लगबग करीत आहे.
कोरोनामुळे यावर्षी शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील मूर्तिकाराकडे गणेश मूर्त्यांची वाढ झाली आहे, असे मूर्तिकार मारुती कुंभार यांनी सांगितले. रंगाच्या किमती वाढलेने मूर्तीचेही भाव वाढले आहेत. कोरोनामुळे सार्वजनिक मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव न करण्याचा निर्णय घेतलेने मुर्तीकाराना याचा फटका बसला आहे. पांडुरंग सुतार यांनी निसर्ग रक्षणासाठी मातीच्या मूर्तींना प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे सांगितले तर वाटगी येथील दत्तू कुंभार,सुरेश कुंभार,गोपाळ देवलकर या मूर्तिकारांच्या मुर्त्या पण परिसरात पोचविल्या जातात. शिरसंगी येथील सागर कुंभार यांनी गणेश मूर्ती रंगविण्यासाठी बऱ्याच तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसायाला झळ पोचलेल्या मूर्तिकाराना शासनाने आर्थिक मदत करणे गरजेचे असल्याचे सागर कुंभार यांनी बोलताना सांगितले.
No comments:
Post a Comment