कुदनूरच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, दुंडगे पुलावरून दुचाकीसह पडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2020

कुदनूरच्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला, दुंडगे पुलावरून दुचाकीसह पडून मृत्यू

कागणी : सी एल वृत्तसेवा
        कुदनूर (ता. चंदगड) येथील अनिल यशवंत बामणे (वय 32) या बेपत्ता तरुणाचा  दुडंगे- कुदनूर पुलावरून दुचाकी  सह पडून मृत्यू झाल्याचे शनिवारी दी. १५ रोजी स्पष्ट झाले. अचानक गायब झालेल्या अनिलचा   मृतदेह चार दिवसांनी  रेस्कू टीमला सापडला. 
       बुधवारी दी. १२ रोजी रात्री सदर घटना घडली आहे. पाच मिनिटात घरी पोहचतो म्हणून अनिलने घरी कॉल केला मात्र त्यापूर्वीच त्याचा अपघात होऊन अचानक गायब झाल्याने सर्वत्र शोधाशोध झाली. कुटुंबीयांनी पुलाची पाहणी केल्याने पुलाचा कठडा तुटल्याचे निदर्शनास आले. या दिशेने तपास सुरू होता.
कोवाड पोलिसांनी सीडीआर द्वारे अनिलच्या मोबाईलचे लोकेशन कुदनुर परिसर असल्याचे स्पष्ट करून तपास सुरू केला. पाथ रेस्कू फोर्स कंपनीच्या  टीमने तीन दिवस ताम्रपर्णी नदीपात्रात शोध मोहीम सुरू करून अनिलचा शोध लावला.
शोध घेणारी रेस्कू फोर्स टीम 
         अनिल हा गत आठ वर्षापासून गोवा येथे केमिकल इंजिनिअर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता. बुधवार दि. 12 रोजी रात्री गोवा येथून अनिल येत असताना दोन वेळा घरी कॉल करून घरी येत असल्याचे सांगितले, मात्र दुंडगे येथून पुढे आल्यानंतर पुलावरून त्याचा ताम्रपर्णी नदीत दुचाकीसह पडून मृत्यू झाल्याचा संशय येत होता.
       रेस्कु टीम प्रमुख श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, विशाल परब, अजय सातार्डेकर, रामदास पाटील संतोष धुरी, युवराज नौकुडकर, शुभम पाटील, गजानन मोहणगेकर यांच्या टीमने परिश्रम घेतले. गुरुवारी यांत्रिक बोटीने भोवरा तयार करून मृतदेह वरती येतोय का तेही पाहण्यात आले मात्र त्याचाही उपयोग झाला नाही. सदर ठिकाणी ताम्रपर्णी नदीत वीस फूट उंचीचा पाण्याचा प्रवाह असल्याने बोटीलाही अडचण निर्माण येत होती. कुदनूर च्या सरपंच शालन कांबळे, राजू रेडेकर, उपसरपंच नामदेव कोकितकर  बाळू शहापुरकर, दिग्विजय जाधव, मोहन मोहनगेकर, विनायक पाटील, तलाठी अमर पाटील, पोलीस पाटील नामदेव लोहार आदींनी कुदनूरचे सामाजिक कार्यकर्ते  चंद्रकांत कांबळे यांच्या सह कोवाड पोलिस चौकीचे सहाय्यक फौजदार हनमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, शिंदे यांनी शोध मोहिमेसाठी मोठे परिश्रम घेतले.

1 comment:

Unknown said...

Plz news clear dyaa news incomplete aahe..
News publish karaychya aagoder ekda read karun ghyaa

Post a Comment