![]() |
कुदनुरच्या युवकाची शोधमोहिम सुरु असताना सापडललेली बॅग. |
कागणी : सी एल वृत्तसेवा
कुदनुर (ता. चंदगड) येथील अनिल यशवंत बामणे (वय 32) हा तरुण गोवा येथून येथे गावी जात असताना दुंडगे पुलावरून बुधवारी दी. १२ रोजी रात्री साडेआठ वाजता पुलावरून ताम्रपर्णी नदी पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत शोध मोहीम सुरू आहे. या दरम्यान शुक्रवारी दुपारी दुंडगे पुला पासून साडेतीन किलोमीटर अंतरावर त्याची बॅग सापडली. या बॅगमध्ये त्याचे आधार कार्ड व अन्य कागदपत्रे सापडली, मात्र त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.
दुंडगे बंधाऱ्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावरील राजगोळी खुर्द ते कामेवाडी यादरम्यान च्या ठिकाणी त्याची बॅग शुक्रवारी दुपारी आढळली. यामध्ये आधार कार्ड, दोन चार्जर, कपडे व सेविंग सेट असे साहित्य मिळून आले.
घटनास्थळी चंदगडचे पोलीस निरीक्षक अशोक सातपुते, कोवाड पोलीस चौकीचे हनमंत नाईक, संतोष साबळे, अमर सायेकर, शिंदे यांच्यासह कुद्नुर चे चंद्रकांत कांबळे , पोलीस पाटील लोहार यांच्यासह
पाथ रेस्कु फोर्स कंपनीच्या टीम ने शुक्रवारी दिवस भर ताम्रपर्णी नदी पात्रात शोध मोहीम केली मात्र अनिल चा थांग पत्ता लागला नाही. रेस्कू टीम प्रमुख श्रीपाद सामंत, पांडुरंग माईनकर, विशाल परब, अजय सातार्डेकर, रामदास पाटील संतोष धुरी, युवराज नौकुडकर, शुभम पाटील, गजानन मोहणगेकर यांची टीम शोध घेत आहे. शुक्रवारी सायंकाळी रात्री सात वाजेपर्यंत या टीमने शोध घेतला.
No comments:
Post a Comment