चंदगड तालुक्याच्या आरोग्य विभागात तब्बल ७२ पदे रिक्त, कोरोनाशी लढताना कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक, रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

15 August 2020

चंदगड तालुक्याच्या आरोग्य विभागात तब्बल ७२ पदे रिक्त, कोरोनाशी लढताना कर्मचाऱ्यांची होतेय दमछाक, रिक्त पदे तात्काळ भरण्याची गरज

नंदकुमार ढेरे / सी. एल. वृत्तसेवा
           चंदगड तालुका आरोग्य विभागात मंजूर 140 पदापैकी ७२ पदे रिक्त असूून कोरोनाच्या महामारीत नाागरिकाना सेवा देणे  उपलब्ध डाॅक्टर,परिचारिका, आरोग्य सेविका, सेवक,आरोग्य सहाय्यक यांच्या नाकी नऊ येत असून शासनाने रिक्त जागा त्वरित भरावीत अशी मागणी नागरिकातून होत आहे.  
           या तालुक्यात ६ प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत असून त्यामध्ये गेल्या चार वर्षापासून ७२ जागा रिक्त आहेत . राजगोळी प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पूर्ण असूनही ते केंद्र अद्याप उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे . कोरोना प्रतिबंधक उपाययोजना राबवित असलेल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचा-याना  अतिरिक्त ताण आला आहे . तालुक्यातील , सहा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची १२ पदे मंजूर असून त्यापैकी ८ पदे रिक्त आहेत . कोवाड येथे २ , तर हेरे , माणगाव , अडकूर , कानूर खुर्द आणि तुडये येथे एक एक पद रिक्त आहे . आरोग्य पर्यवेक्षकाची एक जागा रिक्त आहे . आरोग्य सहाय्यकाची ( पुरुष ) कानूर खुर्द येथील तर आरोग्य सहाय्यक ( स्त्री ) ची कानूर आणि माणगाव येथे पद रिक्त आहे . आरोग्य सेविकाची ३ ९ पदे असून त्यापैकी १६ जागा भरायच्या आहेत . सध्या अडकूर , आमरोळी . इब्राहिमपूर , पाटणे , हेरे , इसापूर , नांदवडे , देवरवाडी ,हजगोळी , शिनोळी बुद्रुक , किणी , राजगोळी बुद्रुक , मलतवाडी , कोवाड , डुक्करवाडी येथे आरोग्य सेविका नाहीत . आरोग्य सेवकांच्या २२ पैकी ८ जागा रिक्त आहेत . कानूर बुद्रुक , सातवणे , बुजवडे , इसापूर , राजगोळी खुर्द , मलतवाडी , किणी आणि माणगाव येथे आरोग्य सेवक नाहीत . कनिष्ठ सहाय्यकाच्या तुडये , माणगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील जागा रिक्त आहेत . औषध निर्मात्याच्या अतिरिक्त ताण पडत आहे.  सहापैकी चार जागा रिक्त आहेत . परिचराच्या २५ पैकी १४ जागा भरलेल्या नाहीत . आरोग्य सहाय्यक ( हिवताप ) च्या माणगाव आणि तुडये येथे तर आरोग्य सेवकाच्या ( हिवताप ) च्या १२ पैकी ९ जागा रिक्त आहेत . त्यामध्ये इब्राहिमपूर , अडकूर , दाटे , नागनवाडी , पाटणे , जंगमहट्टी , मजरे कार्वे , शिनोळी बुद्रुक , हजगोळी या गावांचा समावेश आहे . तालुक्यात आरोग्य विभागाची मंजूर पदे १४० असून त्यापैकी ७२ जागा रिक्त आहेत . जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी तालुक्यात पुरेसे वैद्यकीय कर्मचारी द्यावेत , अशी मागणी नागरिकातून होत आहे .
        कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात पुरेसे कर्मचारी असणे आवश्यक आहे, परंतु चंदगड तालुक्यात आरोग्य विभागात तब्बल ७२ जागा रिक्त आहेत. तालुक्याच्या लोलोकप्रतिनिधीनी या बाबत शासनाशी भांडून या रिक्त जागा भरण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत.

No comments:

Post a Comment